सेल्‍फी काढतांना नदीत पडून वाहून जाणार्‍या महिलेला वाचवले !

सेल्‍फी काढतांना एक महिला पाय घसरून नदीत पडली. ती वाहून जात होती; पण तेथे असलेल्‍या डहाणू पंचायत समितीच्‍या उपसभापतीने वेळीच नदीत उडी मारून महिलेचा जीव वाचवला.

गोवा : कोलवाळ कारागृह प्रशासनाची कारागृहात अचानक तपासणी

कारागृह रक्षक आणि बंदीवान यांचे संगनमत असल्याविना भ्रमणभाष संच आणि इतर पदार्थ कारागृहात बंदीवानांपर्यंत कसे पोचतील ? अशा कारागृह रक्षकांना शोधून त्यांना कारागृहात टाका !

शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घाला ! – युनेस्को

स्मार्टफोनमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम पहाता पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांना त्यापासून दूर ठेवणे आवश्यक !

केदारनाथ मंदिर परिसरात भ्रमणभाष संचावर बंदी !

देशातील सर्वच मंदिरांनी आता असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात बंदीवानाकडे सापडले १५ भ्रमणभाष !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रमणभाष कारागृहात येतातच कसे ? बंदीवानांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही !

चातुर्मासात युवकांनी उपवास करण्यासह  ‘डिजिटल’ उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालावेत ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी

युवकांनी धार्मिक व्रत करण्यासह गूगल, व्हॉटस्ॲप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि स्नॅपचॅट या भ्रमणभाषवरील प्रतिदिन किमान एकाचा वापर न करण्याचा निश्चय केला पाहिजे.

विशिष्ट भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांच्या किमतींत घट !

केंद्रशासनाने भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांच्या किमती अल्प केल्या आहेत. त्यांच्यावर लागणारा वस्तू आणि सेवा कर हा ३१.३ टक्क्यांवरून अनुक्रमे १२ आणि १८ टक्के करण्यात आला आहे.

‘गेम जिहाद’च्या माध्यमातून विवाहित हिंदु महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांची अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. त्यामुळेच धर्मांध मुसलमान नवनवीन क्लृप्त्या योजून हिंदूंचा सहज बुद्धीभेद करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात घ्या !

भ्रमणभाष चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणीला पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांत ४.३० घंटे हेलपाटे मारायला लावले !

भ्रमणभाषसंच गहाळ आणि चोरी या प्रकारांत पोलीस तक्रार प्रविष्ट करण्यास नेहमी टाळाटाळ करतात. गुन्ह्यांची संख्या वाढू नये, यासाठी पोलीस केवळ भ्रमणभाष गहाळ झाल्याचा अर्ज भरून घेत असल्याचे सांगितले जात आहे.

वडिलांनी महागड्या भ्रमणभाषविषयी विचारल्‍याने तरुणाची आत्‍महत्‍या

महागड्या भ्रमणभाषच्‍या आहारी जाणारी आणि संयम नष्‍ट झाल्‍याने क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवणारी आजची तरुणाई !