नाशिक – यवतमाळ जिल्ह्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या ९५ विद्यार्थ्यांची सहल येथे आली होती. यांपैकी २० विद्यार्थ्यांचे भ्रमणभाष चोरीला गेले आहेत. हे विद्यार्थी गोदावरीच्या किनारी असलेल्या संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामी होते. तेथे विद्यार्थ्यांनी प्रभारणासाठी (चार्जिंगसाठी) लावलेले विविध आस्थापनांचे २० भ्रमणभाष, दोन पाकिटे असा एकूण १ लाख ६३ सहस्र रुपयांचा माल चोरीला गेला. सकाळी उठल्यावर विद्यार्थ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. धर्मशाळेचा दरवाजा अर्धवट उघडा होता. तेथूनच चोरट्याने प्रवेश केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित नाशिक ! चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलीस कधी आळा घालणार ? |