देवगड – देवगड समुद्र किनार्यापासून १२ वाव सागरी अंतरात अनधिकृतपणे मासेमारी करणारी मलपी, कर्नाटक येथील एक अतीजलद यांत्रिक नौका (हायस्पीड बोट) २ डिसेंबरला रात्री ११ वाजता मत्स्य विभागाने पकडली. ही नौका देवगड बंदरात आणून त्यातील मासळीचा लिलाव करण्यात आला.
मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेने २ डिसेंबरला रात्री कर्नाटकच्या नौकेला थांबण्याची चेतावणी दिली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून मासेमार नौका घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नांत होते. त्या वेळी मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेतील सागर सुरक्षा रक्षकांनी त्या नौकेत उड्या मारून तिच्यावर नियंत्रण मिळवले. कर्नाटकच्या नौकेत ७ खलाशी (मासेमार) होते.