आज श्री क्षेत्र प्रयाग (कोल्हापूर) येथे श्री स्वामी समर्थ मठात विशेष अन्नदान !

श्री स्वामी समर्थ

कोल्हापूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – येथील श्री क्षेत्र प्रयाग येथे वर्ष २०२० मध्ये मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला श्री स्वामी समर्थ मठ येथे अन्नछत्र चालू झाले. पावसाळ्यात येणार्‍या महापुरानंतर काही दिवस हे थांबवण्यात येते. यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी परत प्रारंभ केले जाते. त्याच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने गुरुवार, ५ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता आरती झाल्यावर अन्नदान प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व स्वामीभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेथील पुजारी श्री. अभिनव गिरी यांनी केले आहे.