युरोपमधील लिथुआनिया देशात चिनी भ्रमणभाष संच न वापरण्याची नागरिकांना सूचना

भारत सरकारनेही अशी सूचना नागरिकांना दिली पाहिजे !

भ्रमणभाषवरील खेळावरून भावासमवेतच्या वादानंतर बहिणीची आत्महत्या !

भ्रमणभाषवरील खेळांचे व्यसन लागल्यामुळे होणारे अनेक दुष्परिणाम समोर येत असल्याने आतातरी पालकांनी मुलांना भ्रमणभाषचा दुरुपयोग करू देण्यास टाळणे आणि प्रशासनाने या खेळांवर निर्बंध आणणे आवश्यक बनले आहे.

शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम ! – शिक्षकांचा सर्वेक्षणातील निष्कर्ष

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे विद्यालय आणि शिक्षक यांच्यापासून बराच काळ दूर राहिल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. विद्यार्थ्यांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम होत आहे.

६०० अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट भ्रमणभाष प्रशासनाला परत केले !

निकृष्ट भ्रमणभाष देणार्‍या संबंधितांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे ! तुटपुंज्या वेतनावर काम करणार्‍या अंगणवाडी सेविकांना भ्रमणभाष दुरुस्तीसाठी व्यय करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे !

बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचार्‍यांचा भ्रमणभाष बंद रहाणार ! – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदेश

बंदोबस्तावरील (कर्तव्यावरील) पोलीस अधिक प्रमाणात भ्रमणभाषवर बोलण्यात, ‘चॅटिंग’ करण्यात तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करतांना निदर्शनास येत आहेत.

सरकारी कर्मचार्‍यांसाठी भ्रमणभाष वापरासंबंधी मार्गदर्शक नियमावली घोषित !

कार्यालयात भ्रमणभाष वापरतांना शिष्टाचार न पाळल्याने सरकारची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या सूचना घोषित केल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

ग्रामीण भागांत भ्रमणभाष मनोरे (टॉवर्स) उभारण्यासाठी भाडेदरात शासनाकडून ५ वर्षांसाठी १० टक्के कपात

सरकारी जागेमध्ये मनोरे उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते केवळ ना हरकत दाखला न देता थेट अनुमतीच देईल.

‘ऑनलाईन’ वर्ग चालू असतांना विद्यार्थी भ्रमणभाषवरील खेळांत (ऑनलाईन गेम्स) व्यस्त असल्याचे उघडकीस !

मडगाव येथील विद्यार्थ्याने खेळात गमावले १ लक्ष रुपये

पिंपरी (पुणे) येथे ६ कोटी रुपयांचे रक्तचंदन पकडले !

रक्तचंदनाने भरलेला ट्रक ताथवडे येथे आहे, अशी माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६ कोटी ५२ लाख ५४ सहस्र रुपयांचे रक्तचंदन जप्त केले आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोव्यात वीज खात्याची मोठ्या प्रमाणावर हानी

गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे.