३१ जानेवारी पूर्वी लाभार्थी शिधापत्रिकेवरील सर्व व्यक्तींचे आधार सिडींग करण्यात येणार ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार आणि भ्रमणभाष क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.

ऑनलाईन पारतंत्र्याच्या उंबरठ्यावर

एका उद्यानाच्या बाहेर विज्ञापन होते की, ‘प्रवेश विनामूल्य आहे.’ ती पाटी वाचून आपसूकच सर्वांचे पाय तिकडे वळतात. सर्व फिरून झाल्यानंतर सांगितले जाते की, ‘येथून बाहेर पडण्यासाठी शुल्क भरावे लागते. केवळ प्रवेश विनामूल्य होता.’ तसेच या व्हर्च्युअल (आधुनिक तंत्रज्ञानाच्या) विश्‍वाचे आहे. आपण या जाळ्यात फसलेलो आहोत.

‘फास्टॅग’ला १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना ‘फास्टॅग’ लावण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले होते.

भ्रमणभाष सुविधा सुधारण्यासाठी २०० भ्रमणभाष मनोरे उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘भ्रमणभाष मनोरे उभारल्याने विद्यार्थी, ‘आयटी’ व्यावसायिक, ‘टॅक स्टॉर्टअप’ आदी समाजाच्या विविध घटकांना लाभ होणार आहे.’’

‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची अ‍ॅमझॉनची सिद्धता

अ‍ॅमेझॉनने मनसेच्या विरोधात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली. यामुळे आता अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे.

कोरोनाच्या विरोधातील लस घेणे ऐच्छिक ! – केंद्र सरकार

एखाद्याला पूर्वी कोरोनाची लागण झाली असेल किंवा नसेल, तरीही लसीची पूर्ण मात्रा घेणे आवश्यक आहे, तरच विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आवश्यक त्या अँटिबॉडीज निर्माण होतात.

कर्नाटक येथील आयफोन बनवणार्‍या आस्थापनाच्या तोडफोडीच्या मागे साम्यवादी संघटनेचा हात !

आयफोन आणि चिनी भ्रमणभाष आस्थापने यांच्यात स्पर्धा असल्याने चीनला साहाय्य व्हावे म्हणून साम्यवाद्यांनी ही तोडफोड केली नाही ना ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !

अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार करणार्‍या २ युवांवर गुन्हा नोंद

अल्पवयीन मुलांना भ्रमणभाषवर अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार फलटण पोलिसात नोंदवण्यात आली.

(म्हणे) ‘भारताने चिनी अ‍ॅप्सवर घातलेली बंदी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी !’ – चीनचा आरोप

भारताच्या सुरक्षेच्या मुळावर येणार्‍या कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे, हे चीनने नेहमीच लक्षात ठेवावे !

भारत सरकारकडून ‘स्नॅक व्हिडिओ’सहित ४३ अ‍ॅप्सवर बंदी

केंद्र सरकारने ४३ भ्रमणभाष अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.