Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने परिचारिका अभ्यासक्रमावर घातली बंदी !

आरोग्यव्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता

प्रतिकात्मक छायाचित्र

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून महिलांसाठी वाईट दिवस चालू झाले आहेत. महिलांवर एकामागून एक अगणित बंधने लादली गेली आहेत. या संदर्भात तालिबान सरकारने तरुणींसाठी असलेला परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रमावर बंदी घातली आहे. अफगाणिस्तानमध्ये आधीच आरोग्यव्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांनी उचललेले हे पाऊल जनतेसाठी आणखी घातक ठरू शकते.

१. तालिबानच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले की, आरोग्य अधिकार्‍यांनी काबुलमधील शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांसोबत हे निर्देश कार्यान्वित करण्यासाठी बैठक घेतली.

२. ‘बीबीसी अफगाण’वर प्रसारित केलेल्या व्हिडिओंमध्ये काही संस्थांमधील महिला प्रशिक्षणार्थी हे वृत्त ऐकल्यानंतर रडतांना दिसत आहेत.

३. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, या बंदीमुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हाने आणखी वाढतील. ‘आमच्याकडे आधीपासूनच व्यावसायिक डॉक्टर आणि पॅरा-मेडिकल स्टाफ यांची कमतरता आहे’, असे या अधिकार्‍याने सांगितले.

संपादकीय भूमिका

भारतात स्त्रीस्वातंत्र्य नाही, असे म्हणणारे अफगाणिस्तानमधील अशा स्त्रीद्वेषी निर्णयांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !