भारत सरकारकडून ‘स्नॅक व्हिडिओ’सहित ४३ अ‍ॅप्सवर बंदी

नवी देहली – केंद्र सरकारने ४३ भ्रमणभाष अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. ‘टिक टॉक’ अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या ‘स्नॅक व्हिडिओ’वरही आता बंदी घालण्यात आली आहे. हे अ‍ॅप्स भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत सरकारने २६८ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.