जयपूर (राजस्थान) – टोंक जिल्ह्यातील मालपुरा येथे वर्ष २००० मध्ये झालेल्या दंगालीमध्ये शेतकरी हरिराम यांच्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने ८ मुसलमानांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इस्लाम, महंमद इशाक, अब्दुल रज्जाक, इर्शाद, महंमद जफर, साजिद अली, बिलाल अहमद आणि महंमद हबीब, अशी त्यांची नावे आहेत. या दंगलीत एकूण ६ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये भाजपचे नेते कैलास माळी यांचाही समावेश होता. त्याच्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने संशयाचा लाभ देत ५ मुसलमान आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जयपूरमधील विशेष न्यायालयाने २ डिसेंबर २०२४ या दिवशी दोन्ही प्रकरणांमध्ये निकाल दिला.
दंगल का झाली होती ?
१० जुलै २००० या दिवशी कैलास माळी यांची टोंक जिल्ह्यातील मालपुरा येथे हत्या करण्यात आली. कैलास माळी यांना चालत्या दुचाकीवरून ढकलून त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. कैलास माळी यांच्या हत्येची बातमी टोंकच्या शहरी आणि ग्रामीण भागात पसरली. प्रचंड तणावाच्या काळात मुसलमानांच्या जमावाने अनेक ठिकाणी हिंदूंना लक्ष्य केले. या काळात दोन्ही बाजूंनी लोकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारातील अन्य १७ जणांविरुद्धचा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडल्यानंतर टोंक जिल्ह्यात उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी कैलास माळी यांना मुख्य आरोपी बनवले होते. याच कारणामुळे ते मुसलमानांचे लक्ष्य होते; मात्र त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे की, कैलास यांना या गुन्ह्यात जाणीवपूर्वक गोवण्यात आले होते.
संपादकीय भूमिका२४ वर्षांनंतर मिळणार न्याय, हा न्याय नव्हे, तर अन्यायच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? |