खासदार हेमा मालिनी यांनी लोकसभेत मांडले बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे सूत्र
नवी देहली – लोकसभेत शून्य तासाच्या वेळी मथुरा मतदारसंघातील भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांचे सूत्र उपस्थित केले. हेमा मालिनी म्हणाल्या की, बांगलादेशातील आपल्या हिंदूंचे आणि मंदिरांचे, विशेषत: इस्कॉन आणि इस्कॉनच्या भाविकांचे काय होत आहे, हे पाहून मला अत्यंत दु:ख झाले. मी व्यथित झाले आहे. हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत, हिंदू अल्पसंख्यांकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कट्टरतावाद्यांकडून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. हे केवळ परकीय संबंधांचे सूत्र नाही, तर भारतातील कृष्णभक्तांच्या भावनांचा प्रश्न आहे.
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की,
१. इस्कॉनची स्थापना जगभरात झाली आहे. आज त्याची सुमारे १ सहस्र केंद्रे आहेत. ते जगभर वैदिक संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी ओळखले जातात. मी स्वतः कृष्णभक्त आणि इस्कॉनची भक्त आहे.
२. कृष्ण माझ्या हृदयात आहे आणि मी त्याच्या पवित्र भूमीची म्हणजे मथुरेची प्रतिनिधी आहे. आपल्या शेजारी बांगलादेशात होणारी आक्रमणे मला आणि आपल्या देशातील कृष्णभक्तांना त्रास देत आहेत.
संपादकीय भूमिकालोकसभेत सर्वाधिक हिंदु खासदार असतांना त्यांपैकी केवळ हेमा मालिनी याच हे सूत्र उपस्थित करत आहेत, हे लक्षात घ्या ! |