१२० कोटी नव्हे, तर १ सहस्र २०० कोटी रुपयांचा अपव्यवहार असल्याचा संशय व्यक्त !
मालेगाव – राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिक मधील मालेगावमधून कोट्यवधी रुपयांचे बँक व्यवहार झाल्याची गोष्ट समोर आली होती. मालेगावमधील बँकेत काही लोकांकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये १२५ कोटी रुपये आले आणि नंतर हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेल्याचे समोर आले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. या प्रकरणात आता ‘नाशिक मर्चेंट को.ऑप. बँके’चे व्यवस्थापक रवींद्र कानडे आणि सहव्यवस्थापक दिपरत्न निकम यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा गैरव्यवहार १२० कोटी रुपयांचा नव्हे, तर १ सहस्र २०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. २१ बनावट आस्थापनांच्या बँक खात्यातून ८०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून गैरव्यवहाराची व्याप्ती महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश आणि देहली या राज्यांपर्यंत असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) अन्वेषणात समोर आली आहे.
🛑The ‘Malegaon Vote J!h@d’ case turns out to be a whopping 1200 Crore scam instead of 120 Crore rupees. Police arrest ‘Namco Bank’ manager and co-manager in this regard.
👉It is clear from this scam that to get Mu$l!m-leaning politicians elected in the elections, transactions… pic.twitter.com/Vvv6Rb5mCN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 5, 2024
१. यापूर्वी मालेगाव ‘व्होट जिहाद फंडिंग स्कॅम’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज महंमद याच्याशी संबंधित २४ हून अधिक ठिकाणी ‘ईडी’ने धाडी टाकल्या होत्या. ईडीकडून ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये चालू होती. आरोपी सिराज महंमदची २४ बेनामी बँक खाती मालेगावच्या ‘नाशिक मर्चेंट बँक’ आणि महाराष्ट्र बँक यांमध्ये सापडली होती.
२. अंमलबजावणी संचालनालयाने शेल आस्थापनांच्या (शेल आस्थापने म्हणजे जी केवळ वित्त पुरवठा मिळवण्यासाठी, ठेवण्यासाठी सिद्ध केलेली असतात, त्यांचे उत्पादन नसते.) २१ बँक खात्यांमधून डेबिट आणि क्रेडिट व्यवहारांद्वारे ८०० कोटी रुपयांचा ‘मनी ट्रेल’ (‘मनी ट्रेल’ म्हणजे पैशांचा मागोवा किंवा पैशांच्या हालचालींचा मागोवा) ओळखला आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश आणि देहली येथे असलेली ही आस्थापने अल्पावधीत स्थापन झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
संपादकीय भूमिकानिवडणुकीत मुसलमानधार्जिणे राजकारणी निवडून येण्यासाठी ‘व्होट जिहाद’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जातात, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले. याचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक ! |