हरिद्वारमध्ये लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करणार ! – मुख्य वैद्यकीय अधिकारी

कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

आपत्काळापूर्वीच कुटुंबाला लागतील अशा औषधांची सोय करून ठेवा !

भीषण आपत्काळात वैद्यकीय औषधे मिळणार नाहीत; परंतु ईश्‍वरी कृपेमुळे काही झाडांचा औषध म्हणून उपयोग करू शकतो. अशा औषधी वनस्पती आपल्या घराची आगाशी, अंगण इत्यादी ठिकाणी करू शकतो.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील कोविड केअर सेंटर पुन्हा चालू करण्याचा निर्णय !

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने कोरोना काळजी केंद्र (कोविड केअर सेंटर) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

आरोग्य साहाय्यिकेसमवेत संबंध ठेवल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी निलंबित !

वैद्यकीय अधिकार्‍याकडून झालेले कृत्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासल्यासारखेच आहे !

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित ! – अधिष्ठाता डॉ. दीक्षित

सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सध्याच्या कोरोना विषाणूमध्ये संसर्ग वाढवण्याचे प्रमाण अधिक ! – डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात सध्याचा कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवत असून नागरिकांचा हलगर्जीपणाही त्यासाठी कारणीभूत ठरत आहे, असे मत आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

झाडेगाव (जिल्हा बुलढाणा) येथे एकाच गावातील १५५ जणांना कोरोनाचा संसर्ग !

काही दिवसांपूर्वी गावात ७ दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे गावकर्‍यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमांतून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमांना गावकर्‍यांसहित बाहेरगावाहून काही मंडळी सहभागी झाली होती; मात्र कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्याने गावात संसर्ग पसरला.

कोल्हापूर जिल्ह्यात ७४ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण ! – डॉ. उमेश कदम, अधीक्षक

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चालू झालेल्या कोरोना लसीकरणातील ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १ सहस्र ७०० पैकी १ सहस्र २७२ जणांना आजपर्यंत ही लस देण्यात आली आहे.

अशा साम्यवाद्यांना निवडून देणार्‍या जनतेला कडक शिक्षा केली पाहिजे !

‘केरळ राज्यातील इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमाच्या विज्ञान विषयाच्या क्रमिक पुस्तकात वैद्यकीय शस्त्रकर्माचे जनक सुश्रुताचार्य यांच्याऐवजी अबू अल कासीमा अलजवाहरी असल्याचे अंतर्भूत करण्यात आले आहे.

आयुर्वेदानुसार आचरण करणारे, प्रेमळ आणि साधनेची ओढ असलेले वैद्य संदेश आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण !

‘वैद्य संदेश चव्हाण हे कुर्ला (मुंबई) येथे आयुर्वेदीय चिकित्सा करतात. वैद्य संदेश अन् त्यांची पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.