१. कुटुंबातील व्यक्तींना असलेल्या विकारांनुसार कोणती औषधे किती प्रमाणात विकत घ्यावीत, तसेच भविष्यात लागू शकतील, अशी नेहमीच्या विकारांवरील किंवा मध्ये मध्ये लागणार्या औषधांची सूची करून, त्यांच्या ‘समाप्ती तिथी’चा विचार करून खरेदी करून ठेवा !
२. आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधे आपण आधीच कुटुंबासाठी पुरेशी खरेदी करून ठेवू शकतो. ही औषधे व्यवस्थित साठवून ठेवली, तर ४-५ वर्षांपेक्षाही अधिक काळ टिकतात. काही आयुर्वेदीय औषधे कायमस्वरूपी टिकणारी असतात, म्हणजे त्यांना ‘समाप्ती तिथी’ (एक्सपायरी डेट) नसते.
३. सध्या चालू असलेल्या ‘अॅलोपॅथिक’ औषधांच्या जोडीलाच हळूहळू आयुर्वेदीय किंवा ‘होमिओपॅथिक’ औषधे चालू करायला हवीत. या औषधांचा गुण दिसायला लागल्यावर हळूहळू ‘अॅलोपॅथिक’ औषधांचे प्रमाण अल्प करून पुढे त्यांची आवश्यकताच भासणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी लागेल.
भीषण आपत्काळासाठी आयुर्वेदीय औषधांची माहिती आणि साठा ठेवा, तसेच लागवड करा !
- भीषण आपत्काळात वैद्यकीय औषधे मिळणार नाहीत; परंतु ईश्वरी कृपेमुळे काही झाडांचा औषध म्हणून उपयोग करू शकतो. अशा औषधी वनस्पती आपल्या घराची आगाशी, अंगण इत्यादी ठिकाणी करू शकतो. त्या आताच लावून ठेवल्यास पुढील काळात त्यांचा उपयोग होईल आणि औषधांविना आपले हाल होणार नाहीत.
- आपल्या सभोवतालच्या परिसरात आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींची जाणकारांकडून माहिती करून घ्या आणि त्यांचा वापर करून पहा. अडूळसा, तुळस, बेल, औदुंबर, पिंपळ, वड, कडूनिंब यांसारख्या औषधी वनस्पती सर्वत्र आढळतात. पुनर्नवा, दूर्वा, आघाडा, माका यांसारख्या वनस्पती बहुतेक ठिकाणी आपोआप उगवतात.
शरीरस्वास्थ्यासाठी याची सवय करा !
‘शरीरस्वास्थ्यानुसार कोणते अन्न आपल्याला आवश्यक आहे’, हे जाणून आवश्यक तेवढा आहार घेण्याची सवय लावावी. आपत्काळात आवडीचे पदार्थ खायला मिळणार नाहीत. त्यामुळे आवडी-निवडी अल्प कराव्यात. आपत्काळात कधी कंदमुळे खाऊन रहाण्याची किंवा उपासमारीची वेळ ओढवू शकते. या दृष्टीनेही मनाची सिद्धता करावी.
- अंघोळीला गरम पाणी लागणे, सतत पंखा हवा असणे, वातानुकूलित यंत्राविना झोप न येणे हे सर्व हळूहळू अल्प करा !
- रहाटाने विहिरीचे पाणी काढणे, कपडे हाताने धुणे, उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर टाळणे, जवळच्या अंतरावरील कामांसाठी सायकल वापरणे आदी कृतींची सवय करा !
- शरीर कार्यक्षम रहाण्यासाठी प्रतिदिन सूर्यनमस्कार घालणे, १ – २ कि.मी. चालणेे, तसेच प्राणायाम, योगासने आदी व्यायाम करावा. दिनचर्या शक्यतो आयुर्वेदानुसार ठेवावी; जेणेकरून रोग होण्याचे प्रमाण अल्प राहील.
केवळ औषधांवर अवलंबून न रहाता अन्य परिणामकारक उपचारपद्धतीही शिकून घ्या !लहानसहान विकारांच्या उपचारांसाठी औषधांवर अवलंबून न रहाता उपवास करणे, अंगावर ऊन घेणे, योगाभ्यास, सोपे व्यायामप्रकार, प्राणायाम, निसर्गोपचार, बिंदुदाबन (अॅक्यप्रेशर), मर्मचिकित्सा, नस चिकित्सा (न्यूरोथेरपी), रंग चिकित्सा, मुद्रा चिकित्सा ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’, ‘नामजप-उपाय’ आणि प्राणशक्तीवहन उपाय’ यांसारख्या अन्यही प्रचलित विनाऔषध उपचारपद्धती शिकून त्यांचाही वापर करता येऊ शकतो. आदी विनाऔषध उपचारांचा वापर करण्यास आतापासूनच आरंभ करणे आवश्यक आहे. डॉक्टर, औषधे आदी नसतांना स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील, अशा विविध उपचारपद्धतींवरील ग्रंथ सनातनने प्रसिद्ध केले आहेत. या अंतर्गत ‘प्राणशक्तीवहन उपाय’ आणि ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ या सोप्या आणि प्रभावी उपचारपद्धतींचा शोध परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः लावला आहे. sanatan.org या संकेतस्थळावरही ही माहिती आहे. उपयुक्तता आणि लाभ या पद्धतीने प्रत्येकाला स्वतःचे स्वतःच आणि घरातल्या घरात उपाय करता येतात. हे उपाय आवश्यकतेप्रमाणे दिवसातून एकदा किंवा जास्त वेळाही करता येतात. या पद्धतीने रोगांची बाह्य लक्षणे अल्प करता येतात आणि पुनःपुन्हा उद्भवणार्या एखाद्या रोगाची परिस्थिती आटोक्यात आणता येते. अन्य एखाद्या प्रकारच्या उपायाच्या पद्धतीला साहाय्यक होऊन प्रकृतीत वेगाने सुधारणा घडवून आणणे शक्य होते. या पद्धतीने शरिराचे अवयव अन् तंत्रव्यवस्था यांची कार्यक्षमता वाढवता येते. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२२३१५३१७ |