केंद्र सरकारने हात आखडता घेतल्याने कोरोनावरील लसींचा तुटवडा निर्माण झाला ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

शेकडो लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. दैनंदिन ८ लाख डोसची आवश्यकता असतांना केवळ ५० सहस्र डोस मिळाले आहेत. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मुबलक लसींचा पुरवठा करायला हवा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे केली. 

डोंबिवली येथील कोविड रुग्णालयात उद्वाहन कोसळून कोरोना रुग्णासह चौघे जण घायाळ !

२३ एप्रिलच्या रात्री ९ वाजता कोरोना झालेल्या रुग्णाला रुग्णालयात भरती करून नेण्यासाठी घेऊन जातांना रुग्णालयाचे उदवाहन यंत्र (लिफ्ट) पहिल्या मजल्यावरून अचानक खाली कोसळले. यात रुग्णासह चौघेजण घायाळ झाले आहेत.

बीड जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने दोघांचा मृत्यू !

ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या मुख्य कॉकपर्यंत अज्ञात व्यक्ती जाते कशी ? यासाठी काही सुरक्षा कशी नाही ? या समस्येकडे संवेदनशीलतेने पाहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या संकटात चीनकडून भारताला साहाय्य करण्याची सिद्धता !

चीनने भारताला कितीही साहाय्य करण्याच्या गप्पा मारल्या, तरी त्याच्या साहाय्याचा भारताला किती लाभ होईल, हेही पहाणे महत्त्वाचे आहे. तसेच नंतर चीनकडून ‘आम्ही संकटाच्या काळात भारताला साहाय्य केले’ असे शेखी मिरवण्याचाही प्रयत्न…..

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील नियमित शस्त्रकर्मे थांबवली !

कोरोना वाढत असतांना शस्त्रकर्म केल्यास त्या रुग्णालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नियमित शस्त्रकर्मे तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली येथील खासगी आधुनिक वैद्यांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना दिला जात आहे ‘रेमडेसिविर’ बाहेरून आणण्याचा सल्ला !

आपत्काळातही पैसे कमावण्याचा धंदा करत रहाणारे आधुनिक वैद्य !

प्रशासनाने अनावश्यक रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांचा बंदोबस्त करावा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) परिसरामध्ये पसरत चाललेल्या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवेदन

उंचगावमध्ये मलेरिया सदृश्य रुग्ण आणि तापाचे रुग्ण यांमध्ये वाढ होत असून याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

५ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अटक !

कोरोनाने रुद्र रूप धारण केलेले असतांना अशा प्रकारे लाचखोरी करणार्‍या आरोग्य अधिकार्‍याला कठोर शिक्षा करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी.

शासनाच्या वतीने बालकांना देण्यात येणार्‍या लसी सुरक्षित ठेवणार्‍या शीतकरण यंत्रणेत (‘कोल्ड चेन’मध्ये) आढळून येणार्‍या त्रुटी

लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.