कोल्हापूर जिल्ह्यात ७४ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण ! – डॉ. उमेश कदम, अधीक्षक

कोल्हापूर, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चालू झालेल्या कोरोना लसीकरणातील ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १ सहस्र ७०० पैकी १ सहस्र २७२ जणांना आजपर्यंत ही लस देण्यात आली आहे. प्रारंभीच्या काळात लस घेण्यास शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये नकारात्मकता होती. त्यामुळे संथगतीने लसीकरण होत होते. गेल्या आठवड्यापासून मात्र आता सकारात्मक पद्धतीने लसीकरण चालू असून प्रतिदिन १०० च्या आसपास कर्मचारी लस घेत आहेत. या लसीचे २ डोस घ्यावयाचे असून ते २८ दिवसांच्या अंतराने घ्यावयाचे आहेत. लवकरच ज्या शासकीय कर्मचार्‍यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याचे आता नियोजन आहे, अशी माहिती सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उमेश कदम यांनी दिली.