चिपळूण बहादूरशेख नाक्यातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याचे काम चालू !

वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसे सैनिकांनी महामार्ग विभागाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली.

संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन थांबवण्याची मनसेची मागणी

चिरे खाणीसाठी एका भूमीचा अहवाल दाखवून दुसर्‍याच भूमीत चिर्‍यांचे उत्खनन चालू आहे. या दोन्ही भूमींचा सातबारा वेगवेगळा आहे. एका व्यक्तीच्या अनुमतीवर एकाहून अधिक चिर्‍यांच्या खाणी चालू आहेत.

वाचणार्‍याला कळत नाही इतकी सर्वोच्च न्यायालयाची भाषा गुंतागुंतीची !  – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

नोटिसा येतात तेव्हा त्यांतील भाषा वाचल्यावर ‘मला सोडले आहे कि अटक केली ?’, हेच कळत नाही, इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते, असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

रत्नागिरीला येत असतांना दहिसरचे मनसे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू

मनसेचे राज ठाकरे यांची ६ मे या दिवशी रत्नागिरीला होत असणार्‍या सभेसाठी मुंबईहून येत असतांना दहिसर येथील मनसेचे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

ठाणे येथील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणचे अतिक्रमण न हटवल्यास तेथे शंकराचे मंदिर उभारू !

लँड जिहादच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची चेतावणी
भारतीय वायूसेनेच्या तळाला धोका

विद्यार्थ्यांकडून ३० वेळा लिहायला लावले ‘मी पैसे आणायला विसरणार नाही’ हे वाक्य !

विद्यार्थ्यांवर पैशासाठी दबाव टाकून त्यांच्या बालमनाचा विचारही न करणारे शिक्षक असणार्‍या अशा शाळा विद्यार्थ्यांना काय घडवणार ?

सिंधुदुर्ग : मनसेच्या पदाधिकार्‍यांनी अचानक केली आंबोली घाटाची पहाणी !

नाक दाबले की, तोंड उघडते, ही म्हण सार्थ करणारी पोलिसांची कारवाई ! मनसेने आवाज उठवण्यापूर्वी पोलिसांना ही अवजड वाहतूक दिसत नव्हती कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात होते ?

रत्नागिरीतील अनधिकृत मजार १५ दिवसांत हटवा ! – मनसेची जिल्हाधिकार्‍यांना चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? ही अनधिकृत मजार उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अनधिकृत मजार उभारणार्‍यांसह त्यास उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई करा !

वाडी (जिल्‍हा नागपूर) येथे नगर परिषदेच्‍या कार्यालयात मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांकडून तोडफोड !

वाडी नगर परिषदेच्‍या क्षेत्रातील नाली बांधकाम, रस्‍त्‍याची कामे आणि मैदानाची प्रलंबित कामे यांकडे लक्ष वेधण्‍यासाठी मनसेचे काही पदाधिकारी नगर परिषदेच्‍या कार्यालयात गेले होते.