ठाणे येथील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणचे अतिक्रमण न हटवल्यास तेथे शंकराचे मंदिर उभारू !

  • लँड जिहादच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची चेतावणी

  • भारतीय वायूसेनेच्या तळाला धोका

  • वन विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष

  • प्रशासनाकडून रमझानचे कारण देत कारवाईत चालढकल !

ठाणे – पर्यटकांची वर्दळ असणार्‍या येऊरमधील मामा-भांजे दर्ग्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायूसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. अनधिकृत धर्मस्थळांपेक्षा देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशासनाने हे अतिक्रमण तात्काळ हटवावे, अन्यथा दर्ग्याच्या शेजारीच शंकराचे मंदिर उभारू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे दिली.

निवेदनात म्हटले आहे की,…

१. मामा-भांजे दर्ग्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे करण्यात आली आहेत, अशा अनेक तक्रारी स्थानिकांनी मनविसेकडे केल्या आहेत.

२. हवाई दलाच्या स्टेशनच्या १०० मीटर परिसरात झाडे लावण्यास मनाई असतांना बिनदिक्कतपणे अशी अनधिकृत बांधकामे चालू आहेत. त्यामुळे भारतीय वायूसेनेच्या अधिकार्‍यांनी पत्रव्यवहार करून वन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी येथील अवैध बांधकामे त्वरित हटवण्याची मागणी प्रशासनाकडे केली; मात्र प्रशासनाने रमझानचे कारण देत कारवाईत चालढकलपणा केला. (अतिक्रमणकर्त्यांसमोर नांगी टाकणारे प्रशासन ! – संपादक)

याचा परिणाम म्हणून शेवटी मनसेने थेट वनविभागाला निवेदन देऊन अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम त्वरित हटवण्याची मागणी करून वरील चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

वायूसेनेच्या तळासारख्या संवेदनशील ठिकाणच्या परिसरात अतिक्रमण होईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ? यास उत्तरदायींवर प्रथम कारवाई करा !