द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद !

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर (पुणे) येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पार पडलेली, ६५० विश्वस्त आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये कुटुंबभावना अन् धर्मबंधुत्व निर्माण करणारी…

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या माध्यमातून मंदिर-मुक्ती संग्रामाला आरंभ !

मंदिरांचे सरकारीकरण करून समस्या सुटत नाहीत, उलट त्या ठिकाणी सरकारी लोक अनेक पटीने भ्रष्टाचार करतात, हे लक्षात येते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही निधर्मी सरकारला मंदिर कह्यात घेण्याचा किंवा ते चालवण्याचा अधिकार नाही.

हलाल अर्थव्यवस्था म्हणजे आधुनिक ‘जिझिया कर’ ! – श्री. रमेश शिंदे

आज मुसलमानांना हलाल विकण्यासाठी प्रमाणपत्र घेणारे आपल्याकडूनच त्याचे पैसे वसूल करत आहेत.

विघ्नहर गणपति मंदिराच्या (ओझर) संकेतस्थळाचे अनावरण !

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हस्ते संकेतस्थळाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून संकेतस्थळाचे अनावरण केले.

२६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत होणार ‘जिल्हा मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

ओझर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची ३ डिसेंबर या दिवशी सांगता झाली. २ दिवसांसाठी आयोजित या परिषदेमध्ये उपस्थित राहिलेल्या विश्‍वस्तांनी २६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे सांगितले.

गाव तेथे मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

पंढरपूर येथील मंदिरात ‘पैसे’ देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीला लागू करू दिले नाही. त्यासाठी लढा दिला. मंदिर समितीने भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही आम्ही विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पडले.

काळानुरूप अपेक्षित अशी प्रसिद्धीमाध्यमे वापरून मंदिरांनी त्यांचा विषय समाजापर्यंत पोचवला पाहिजे ! – श्री. नीलेश खरे, संपादक ‘झी २४ तास’

ते ‘मंदिर आणि मिडिया मॅनेजमेंट’ या विषयावर २ डिसेंबरला दुपारच्या सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

Advocate Vishnu Jain : काशी-मथुरा मुक्त करून पुन्हा सनातन धर्माला सोपवण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये उपस्थित मंदिरांच्या विश्‍वस्तांना मंदिरांच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याचे आवाहन करतांना अधिवक्ता जैन बोलत होते.

धर्म, भक्त आणि देव यांचे हित लक्षात घेऊन मंदिरांचे व्यवस्थापन पहावे !

‘मंदिर सुव्यवस्थापन’ परिसंवादामध्ये विश्‍वस्तांची भावना !

मंदिरांवर आधारित हिंदूंची अद्भुत दैवी अर्थव्यवस्था !

भारतात आधीपासून एक महत्त्वाची व्यवस्था कार्यरत होती, ती म्हणजे मंदिर आधारित अर्थव्यवस्था किंवा मंदिरांवर आधारित संस्कृतीची व्यवस्था ! ही व्यवस्था आताही आहे. केवळ त्या दृष्टीने त्याची ओळख नाही.