आज माणगांव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’

सिंधुदुर्ग : मंदिरांच्या प्राचीन प्रथा-परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन, मंदिरांचे व्यवस्थापन, पुरातन मंदिरांचे जतन, मंदिरांतील समस्या सोडवणे यांसाठी २० फेब्रुवारी या दिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’ होत आहे.

या अधिवेशनाला माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्यासह निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ता अन् अभ्यासक आदी ३०० हून अधिक जण सहभागी होणार आहेत.