आज ‘भारत बंद’च्या दिवशी दूध, फळ आणि भाजीपाला यांची वाहतूकही बंद रहाणार
केंद्र सरकारने संमत केलेल्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या १३ दिवसांपासून देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारने संमत केलेल्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या १३ दिवसांपासून देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ करण्याचे आवाहन केले आहे.
कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी देहलीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. आंदोलकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला .
देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्यांच्या आंदोलनाचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे.
‘देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला समलिंगी जोडप्यांच्या याचिकेवर कारणे दाखवा नोटीस पाठवली असून याविषयी म्हणणे मांडण्यासंदर्भात सांगितले आहे. समलिंगी जोडप्यांच्या विवाहांना मान्यता देण्यासंदर्भात नुकतीच याचिका प्रविष्ट करण्यात आली. यावर भारतीय कायदे आणि हिंदु संस्कृती यांच्या कसोटीवर विश्लेषण पहाणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्यावरून पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश येथील शेतकर्यांच्या ‘चलो दिल्ली’ या आंदोलनातील शेतकरी संघटनांशी ५ डिसेंबरला केंद्र सरकार तिसर्या फेरीची चर्चा करणार आहे.
हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी २ डिसेंबर या दिवशी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोर्चा काढून प्रांताधिकार्यांना निवेदन दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा दळणवळण बंदी घोषित करण्यात येऊ नये, यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्यासाठीची मागणी अधिवक्ता हर्षल मिराशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लव्ह जिहाद्यांच्या कारस्थानांना हिंदु युवती बळी पडू नयेत, धर्मांतरासाठी दाखवल्या जाणार्या आमिषाला बळी पडू नये, याकरता बालपणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण देणे, स्वधर्माविषयी अभिमान वाढेल, असे धर्मशिक्षण देणे, आयुष्यातील कठीण प्रसंगांत स्थिर राहून धर्माची कास धरून वाट काढणे, हेच आता हिंदु समाजाला शिकवायला हवे !
‘महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संतुलन राखण्यासाठी, तसेच विश्वासघातकी लोकांपासून मुली अन् महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करावा – भाजपचे नेते राज पुरोहित