
नाशिक – आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा नसून प्रादेशिक अर्थव्यवस्थेला गती देणारा, रोजगारनिर्मितीला चालना देणारा महाउत्सव आहे, असे विधान नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ‘सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट’ येथे आयोजित ‘सुशासन, अर्थव्यवस्था आणि कुंभ व्यवस्थापन’ या विशेष परिसंवादात ते बोलत होते. या वेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी या वेळी मांडलेली सूत्रे
१. देशाच्या प्रगतीचे मोजमाप केवळ ‘जीडीपी’ (सकल देशांतर्गत उत्पादन) किंवा बाजारमूल्य यांवर न करता समाजातील संधी आणि संसाधनांचे समान वितरण कितपत झाले, यावरही केले गेले पाहिजे.
२. कुंभपर्व हे अध्यात्म, अर्थव्यवस्था आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा संगम आहे. या महाउत्सवामुळे स्थानिक व्यापार, पर्यटन, सेवा क्षेत्र आणि रोजगारनिर्मिती यांना मोठी चालना मिळून प्रादेशिक अर्थव्यवस्थेत भांडवल आणि रोख प्रवाह वाढणार आहे.
३. विद्यार्थ्यांनी कुंभपर्वाशी संबंधित प्रत्यक्ष प्रशासकीय आव्हानांवर काम करावे. ‘जी.आय.एस्.’, ‘मॅटलॅब’, ‘एस्.पी.एस्.एस्.’ आणि ‘ट्रॅफिक सिम्युलेशन’ यांसारख्या तांत्रिक आधुनिक विश्लेषणात्मक साधनांचा प्रभावी वापर केला पाहिजे.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन