
पन्हाळगड (जिल्हा कोल्हापूर) – ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘वीर शिवा काशिद, नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा विजय असो’, अशा अंगावर रोमांच उभे करणार्या जयघोषात आणि संपूर्ण शिवमय वातावरणात ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड या ७५ व्या अमृत महोत्सवी मोहिमेचा थाटात शुभारंभ झाला. कोल्हापूरच्या प्रसिद्ध ‘हिल रायडर्स’ संस्थेच्या वतीने या अत्यंत खडतर आणि ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत राज्यभरातून ७५० शिवप्रेमी युवक-युवती सहभागी झाले आहेत.
मोहिमेचा प्रारंभ पन्हाळगड येथील नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाला. ध्येयमंत्राचे पठण छोटा शिलेदार रायभान ढोली याने अत्यंत धीरोदात्त आवाजात केले. त्यामुळे उपस्थित सर्वांचे बाहू स्फुरण पावले. ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या धारकर्यांनी सादर केलेली लाठी-काठी, तलवारबाजी आणि दांडपट्टा यांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, नगराध्यक्षा पवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, उद्योगपती संग्राम पाटील, क्रीडा सभापती विजय खाडे, सन्मती मिरजे यांसह अन्य उपस्थित होते.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन