८ डिसेंबरला शेतकर्‍यांचा एक दिवसीय भारत बंद

जनतेला वेठीस धरून होणारी आंदोलने जनताद्रोहीच !

नवी देहली – गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्यावरून पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश येथील शेतकर्‍यांच्या ‘चलो दिल्ली’ या आंदोलनातील शेतकरी संघटनांशी ५ डिसेंबरला केंद्र सरकार तिसर्‍या फेरीची चर्चा करणार आहे. मागील दोन चर्चांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नसतांना आता शेतकर्‍यांनी ८ डिसेंबरला एक दिवसाचा भारत बंद शेतकर्‍यांनी पुकारला आहे.

‘कृषी कायदा रहित करा’, अशी मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे, तर केंद्र सरकारने ‘कृषी कायद्यातील कोणते नियम रहित करायचे, यावर चर्चा करावी’, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे हा गुंता सुटण्यास वेळ लागत आहे. या आंदोलनामुळे नवी देहलीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.