‘फेसबुक’वरील ओळखीतून महिलेचा नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा !

प्रतीकात्मक चित्र

मुंबई – ‘फेसबुक’वर झालेल्या ओळखीतून एका युवतीने रशियातून भारतात आल्याचे सांगून सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडल्याचे सांगितले आणि नालासोपारा येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीला ७ लाख ३८ सहस्र रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘सीमाशुल्क अधिकार्‍याने पकडले आहे. स्वत:कडील मूल्यवान वस्तू सीमाशुल्क विभागाकडून परत घेण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे’, असे या युवतीने नालासोपारा येथील व्यक्तीला सांगितले. त्यावरून या व्यक्तीने युवतीच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवले. पैसे प्राप्त होतात युवतीने अधिकोषातील खाते आणि फेसबूक खाते बंद केले. त्यावर स्वत:ची फसवणूक झाल्याचे व्यक्तीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.