यंदाची वारी ‘हरित वारी’ करण्याचा संकल्प

कोल्हापूर, १९ जुलै (वार्ता.) – आषाढीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाणार्या वारकरी दिंड्यांनी २०० वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेल्या श्री सद्गुरु रामचंद्र महाराज मठात विसावा घेत भजन-कीर्तन केले. यात प्रामुख्याने हणमंतवाडी, बालिंगा, दोनवडे, शिंगणापूर, फुलेवाडी, येवती चुये, परिते, गंजी गल्ली विठ्ठल मंदिर, पावस येथील स्वामी स्वरूपानंद पालखी यांचा समावेश होता.

या दिंड्यांमधील वारकर्यांना १०० हून अधिक रोपे वृक्षारोपण करण्यासाठी देण्यात आली. या रोपांमध्ये गुळवेल, पारिजातक, तसेच अन्य आयुर्वेदीय वृक्षांचा समावेश होता.


ह.भ.प. महादेव यादव महाराज म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांनी वृक्षांचे महत्त्व आपल्याला सांगितले आहे. सध्याचा काळ आपण पहातो की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. जागतिक पातळीवर हवामानात पालट होत आहेत. त्यामुळे या दिंड्यांच्या माध्यमातून आम्ही यंदाची वारी ‘हरित वारी’चा संकल्प करून दिंड्यांमधील वारकर्यांना वाटेत लावण्यासाठी रोपे दिली.’’


या प्रसंगी ह.भ.प. पुरुषोत्तम यादव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यादव, ह.भ.प. अशोक महाराज, ह.भ.प. दीपक म्हापकर, ह.भ.प. कृष्णात जांभळे, ह.भ.प. दिलीप पाटील, वृक्षमित्र श्री. चौगुले यांसह अन्य उपस्थित होते.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन