‘द्विपक्षीय राजकीय प्रणाली’साठी घटनादुरुस्ती करा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

मुंबई – लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा निर्णयापेक्षा देशातील राजकीय अस्थिरता नष्ट करण्यासाठी ‘द्विपक्षीय राजकीय प्रणाली’साठी घटनादुरुस्ती करा, असे पत्र ‘महाराष्ट्र करणी सेने’चे प्रमुख अजय सिंह सेंगर यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  पाठवले आहे.

या पत्रात सेंगर यांनी म्हटले आहे की, देशाची प्रगती आणि विकास हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन यांसारखा होऊ शकला नाही, त्याला बहुपक्षीय राजकीय प्रणाली कारणीभूत आहे. अनेक राज्यांत प्रादेशिक राजकीय पक्ष हे जाती, धर्म आणि भाषा वाद यांसारख्या सूत्रांसमवेत राजकीय भ्रष्टाचाराच्या समस्या निर्माण करून सामाजिक विषमता निर्माण करत आहेत. राजकीय स्थिरता आणि एका सफल लोकशाहीसाठी द्विपक्षीय प्रणालीची आवश्यकता फार आहे. द्विपक्षीय प्रणाली मध्यमार्गी विचारांना प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांना अशा समान भूमिका घेण्यास प्रवृत्त करते.