
पंढरपूर – आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास, तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत् रोषणाईमुळे संपूर्ण परिसराचे रूप अधिकच देखणे, दिमाखदार आणि भक्तीमय झाले आहे. आषाढी यात्रेनिमित्त राज्यासह देशभरातून लाखो वारकरी आणि भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत येत आहेत. सूर्यास्तानंतर संपूर्ण परिसर विविधरंगी प्रकाशाने उजळून निघत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभार्यावरील कळसावर करण्यात आलेली सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन