१ कोटी रुपयांचे नकली मद्य सिद्ध करण्याचे साहित्य जप्त

दौंड (पुणे) – येथील कुरकुंभ एम्.आय.डी.सी.तील (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) ‘समर्थ लॅबोरेटरीज’ या आस्थापनावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथक आणि दौंड पोलिसांनी धाड घातली. त्यातून १५ लाख लिटर नकली मद्य सिद्ध करण्याचे साहित्य जप्त केले. याचे अनुमाने १ कोटी रुपये मूल्य आहे. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली.
धाडीत ३ सहस्र ४२० किलो प्रतिबंधित ‘क्लोरल हायड्रेट’ आणि ५ सहस्र ८०० लिटर घातक रसायने सापडली. या साहित्यापासून नकली मद्य सिद्ध करण्यात येत होते. आस्थापनाचा मालक किशोर सुर्वे याच्यावर यापूर्वीही एन्.डी.पी.एस्. कायद्यांतर्गत गुन्हे नोंद आहेत. (कायद्याचा धाक नसल्यानेच यापूर्वी गुन्हे नोंद असूनही पुन्हा अवैध कामे करण्यास आरोपी धजावत आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन