
पुणे – राज्यात ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेच्या अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागातील हॉटेल, बेकरी, डेअरी येथे तपासणी करून कारवाई केली. अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि मानक कार्यपद्धती यांच्याशी संबंधित नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने १० आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. मंगळवार पेठेतील ‘स्टार केटरिंग सर्व्हिसेस’, सोमवार पेठेतील ‘अशोक बार अँड रेस्टॉरंट’, येवलेवाडी येथील ‘गोल्डन मॅजेस्टिक बेकरी’, कोंढव्यातील ‘गोल्डन बेकरी’, बाणेर येथील ‘विकींग बिर्याणी’, आंबेगाव येथील ‘सिद्धार्थ ऍग्रो डेअरी’ यांसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही कारवाई केली आहे. ग्राहकांना विनामूल्य आणि शुद्ध पिण्याचे पाणी देणे, चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ विक्रीला ठेवणे, तेलाचा पुनर्वापर टाळणे, अनुमतीविना व्यवसाय न करणे, ग्राहकांची दिशाभूल करणारी माहिती न देणे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ग्राहकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री