‘चिन्मय मिशन दक्षिण आफ्रिका’ने केले होते ‘मॅन टू हनुमान’ या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन

चॅट्सवर्थ (दक्षिण आफ्रिका) – ‘चिन्मय मिशन दक्षिण आफ्रिके’ने ‘मॅन टू हनुमान’ (मनुष्यापासून हनुमंतापर्यंत) या आध्यात्मिक कार्यक्रमाचे येथे नुकतेच आयोजन केले होते. आफ्रिकेच्या इतिहासातील हा हिंदूंचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा मेळावा ठरला. कार्यक्रमात १७ सहस्रांहून अधिक भाविकांनी एकत्र येऊन २७ वेळा हनुमान चालिसाचे पठण केले, अशी माहिती ‘चिन्मय मिशन’चे श्री. अपराजित अय्यर यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.


‘चिन्मय मिशन दक्षिण आफ्रिके’या संस्थेचे आध्यात्मिक प्रमुख पूज्य स्वामी अभेदानंद सरस्वती यांचे ‘येथील सर्व हिंदूंना भाषा, प्रांत, आर्थिक स्थिती इत्यादी सर्व सामाजिक भेद बाजूला ठेवून एकाच छत्राखाली एकत्र आणणे’, हे स्वप्न होते. हे स्वप्न या गौरवशाली कार्यक्रमाच्या रूपाने साकार झाले. हा कार्यक्रम ‘जागतिक चिन्मय मिशन’च्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमत्तही आयोजित करण्यात आला होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देणारे एक विशेष पत्र पाठवले होते. यात त्यांनी ‘चिन्मय मिशन’च्या योगदानाचा गौरव केला आणि प्रार्थनेच्या माध्यमातून श्रद्धा अन् एकात्मता यांचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध भजन गायक श्री. अनुप जलोटा हेसुद्धा उपस्थित होते.
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !