पिंपरी-चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण

पुणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ (टाकाऊतून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेची ‘राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग’ आणि ‘राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगा’ने गंभीर नोंद घेतली. याविषयी दोन्ही आयोगांनी पिंपरी-चिंचवड महापालिका, समाज कल्याण आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना नोटीस देऊन १५ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेच्या प्रकरणी ‘अखिल भारतीय सफाई मजदूर संघा’चे केंद्रीय कायदा सल्लागार अधिवक्ता सागर चरण यांनी दोन्ही आयोगांकडे तक्रार प्रविष्ट केली होती.
मृत्यूमुखी पडलेल्या सर्व कामगारांची माहिती, सामाजिक प्रवर्ग, प्रथम माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.), शवविच्छेदन अहवाल, पंचनामा, वारसांना मान्य केलेले आर्थिक साहाय्य आणि हानीभरपाई यांचा तपशील देण्याचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची चौकशी, संबंधित विभाग आणि अधिकार्यांचे दायित्व निश्चित करण्यासाठी केलेली कार्यवाही, भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी राबवण्यात येणार्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अहवालही आयोगांनी सादर करण्यास सांगितले.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन