चीनकडून मणिपूरमधील आतंकवाद्यांना शस्त्रपुरवठा आणि प्रशिक्षण

गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीनुसार चीन ईशान्य भारतात विशेषतः मणिपूरमधील आतंकवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत आहे. ४ आतंकवादी नेत्यांना ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते.

बंगालमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंना मतदान करण्यापासून रोखले जाते ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

केवळ बंगालमध्येच नव्हे, तर अन्य राज्यांतील मुसलमानबहुल भागात असे होते का ? याची माहिती आता निवडणूक आयोगाने आणि तेथील सरकारने घेतली पाहिजे आणि जर असे होत असेल, तर तेथे हिंदूंना संरक्षण देत त्यांना मतदान करू दिले पाहिजे !

भारताचे पहिले शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद यांच्या मनात भारताविषयी प्रेम नव्हते !- भाजपचे उत्तरप्रदेशातील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

शुक्ला यांचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी अबुल कलाम आझाद यांचा चालू असलेला उदो उदो बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

डुकराचा अंश असलेल्या कोरोना लसीला ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’ची मान्यता

कोरोनाच्या विषयात ‘पोर्क जिलेटीन’कडे अन्न म्हणून नव्हे, तर औषध म्हणून पाहिले जात आहे – ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’चे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन

डुकराची चरबी असल्याच्या शक्यतेवरून चीनकडून सिद्ध करण्यात येणारी कोरोनावरील लस न वापरण्याचा मुसलमान संघटनांचा निर्णय

धर्माच्या आधारे कोरोना लसीला इस्लामी राष्ट्र मान्यता देते; पण भारतातील मुसलमान विरोध करतात ! ही त्यांची धर्मांधातच नव्हे का ?

श्रीराममंदिर १ सहस्र नव्हे, ३०० ते ४०० वर्षे टिकले तरी पुरे आहे !  – चंपत राय, सरचिटणीस, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट  

यावरून प्राचीन वास्तूशिल्पे आणि मंदिरे, जी सहस्रो वर्षांपासून उभी आहेत, त्यांचे बांधकाम किती श्रेष्ठ होते, हे आपल्या लक्षात येते !  

पोप फ्रान्सिस यांच्या इंस्टाग्राम खात्यावरून पुन्हा बिकिनी घातलेल्या मॉडेलचे छायाचित्र ‘लाईक’ !

असे हिंदूंच्या संतांच्या सामाजिक माध्यमांवरील खात्याविषयी झाले असते, तर प्रसारमाध्यमांनी त्यांची हेटाळणी करत अपकीर्ती केली असती; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंविषयी प्रसारमाध्यमे ढोंगी निधर्मीवादाचा बुरखा घालून पत्रकारिता करतात !

इराकमधील एक जरी अमेरिकी नागरिक ठार झाला, तर इराणवर सैन्य कारवाई करू !

भारताने इतक्या वर्षांत पाकला कधी अशी चेतावणी दिली आहे का ? अमेरिकेप्रमाणे भारत वागला असता, तर जिहादी आतंकवाद आणि पाक या दोन्ही समस्या कायमच्या सुटल्या असत्या !

देहली विमानतळावरून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) गेल्या काही वर्षांपासून पसार असणार्‍या खलिस्तानी आतंकवादी गुरजीतसिंह निज्जर याला देहली विमानतळावरून अटक केली. वर्ष २०१७ मध्ये निज्जर सायप्रस या देशामध्ये पळून गेला होता.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता संसर्ग

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिथे दळणवळण बंदी अधिक कडक करण्यात आली आहे. हा ‘स्ट्रेन’ (विषाणू) नियंत्रणाबाहेर असल्याचे तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे युरोपीय देश सतर्क झाले आहेत.