पोप फ्रान्सिस यांच्या इंस्टाग्राम खात्यावरून पुन्हा बिकिनी घातलेल्या मॉडेलचे छायाचित्र ‘लाईक’ !

असे हिंदूंच्या संतांच्या सामाजिक माध्यमांवरील खात्याविषयी झाले असते, तर भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यांची हेटाळणी करत त्यांची अपकीर्ती केली असती; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंविषयी प्रसारमाध्यमे ढोंगी निधर्मीवादाचा बुरखा घालून पत्रकारिता करत असतात, हे लक्षात घ्या !

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा बिकिनी घातलेल्या एका मॉडेलचे छायाचित्र ‘लाईक’ केले

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या ‘इंस्टाग्राम’ अकाऊंटवरून बिकिनी घातलेल्या एका मॉडेलचे छायाचित्र ‘लाईक’ केले आहे.

काही दिवसांपूर्वीच याच अकाऊंटवरून ब्राझिलच्या नतालिया गरिबोटो या मॉडेलचा तोकड्या कपड्यांमधील छायाचित्र ‘लाईक’ केल्याचे समोर आले होते. त्यावरून गदारोळ झाला होता. त्यानंतर हे छायाचित्र ‘अनलाईक’ करण्यात आले होते. या घटनेची गंभीर नोंद घेत व्हॅटिकनने इंस्टाग्रामकडे पोप यांच्या अकाऊंटवरून छायाचित्र कसे लाईक झाले, याविषयी विचारणा केली होती.

आता २३ डिसेंबर या दिवशी ‘मार्गोट फॉक्स’ नावाच्या एका बिकिनी मॉडेलने ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करून पोप यांनी तिचे छायाचित्र लाईक केल्याचा दावा केला आहे. तसेच ‘पोप यांनी माझे छायाचित्र लाईक केले म्हणजे मी आता स्वर्गात जाणार’, असे तिने लिहिले आहे.