मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायद्याला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

एकेक राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच तसा कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत विमानाने शारजाहून ८५ नागरिक गोव्यात

भारतात येऊ इच्छिणार्‍या विदेशातील भारतीय प्रवाशांसाठी ५३ वे विमान गोव्यात ८५ प्रवाशांना घेऊन आले. भारत शासनाच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत हे विमान शारजाहून २६ डिसेंबरला सकाळी गोव्यात पोचले.

मेरठच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रदूषणामुळे ७ शिक्षकांची स्थानांतराची मागणी

संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

८ वर्षांपूर्वी हिंदु तरुणीशी विवाह करणार्‍या मुसलमानाची घरवापसी !

कासिम याने म्हटले की, माझे पूर्वज बाबरचे वंशज नव्हते, असे मला वाटत होते. आमचे पूर्वजही हिंदु समाजाचाच भाग होते. मी आज माझ्या समाजामध्ये आलो आहे. संपूर्ण कुटुंब माझ्यासमवेत आहे. कोणत्याही दबावाविना मी धर्मांतर केले आहे.

नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांची भूमी बळकावणार असल्याच्या भूलथापांना बळी पडू नका !

काही नेते शेतकर्‍यांचे नाव पुढे करून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्याला विरोध करणार्‍यांवर टीका केली.

उत्तरप्रदेशात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यास गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार !

रक्षक नव्हे भक्षक पोलीस ! उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे दर्शवणारी आणखी एक घटना ! अशा पोलिसांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी जनतेने केल्यास त्याच चुकीचे ते काय ?

अनुसूचित जाती-जमातींमधील बांधवांना अजूनही पुरेश सुविधा नाहीत ! – मद्रास उच्च न्यायालय

स्वातंत्र्यानंतरच्या ७३ वर्षांत अनुसूचित जाती आणि जमाती यांना विविध सुविधा देण्याच्या योजना आणि कायदे करूनही जर त्यांना पुरेशा सुविधा मिळालेल्या नसतील, तर त्याला आतापर्यंतचे शासनकर्ते आणि प्रशासन हेच उत्तरदायी आहेत !

जिहादी आतंकवादी हाफीज सईद याला आणखी १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हाफीज सईद याला यापूर्वीही शिक्षा झाली आहे; मात्र तो घरातच सर्व सुखे उपभोगत आहे. त्यामुळे त्याला अशा कितीही शिक्षा झाल्या तरी त्याच्यावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही . अशी शिक्षा म्हणजे पाकची जगाच्या डोळ्यातील धूळफेक आहे !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्यासाठी ट्विटरवर २ हॅशटॅग ट्रेंड

#BanPFI हा हॅशटॅग ट्रेंड पहिल्या, तर #PFIExposed चौथ्या क्रमांकावर !

चीनने क्षमा मागावी किंवा कारवाईसाठी सिद्ध व्हावे ! – अफगाणिस्तानची चेतावणी

फगाणिस्तानमध्ये हेरगिरी करणार्‍या चीनच्या १० हेरांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघे जण ‘हक्कानी नेटवर्क’ या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात होते.