|
मुंबई – चीनमध्ये सिद्ध करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीमध्ये डुकराची चरबी असल्याच्या शक्यतेवरून मुसलमान संघटनांनी ही लस न घेण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त अरब अमीरातीकडून (यू.ए.ई.कडून) याविषयी फतवा काढण्यात आला आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतील ९ मुख्य मुसलमान संघटनांची २३ डिसेंबर या दिवशी विषयी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
…तो मुसलमान नहीं लगवाएंगे कोरोना वैक्सीन? सुअर की चर्बी से बने होने का शक, फतवा जारीhttps://t.co/Ex6dGZJBD4 via @NavbharatTimes
— NBT Hindi News (@NavbharatTimes) December 23, 2020
या वेळी रझा अकादमीचे सचिव मौलाना सय्यद नूरी म्हणाले, ‘‘चीनमध्ये कोरोनावर सिद्ध करण्यात आलेल्या लसीमध्ये डुकराचे केस, चरबी आणि मांस यांचा वापर करण्यात आला आहे. डुकराचा एक केस विहिरीत पडला, तरी त्या विहिरीचे पाणी वापरले जात नाही. त्यामुळे चीनमधील कोरोना लसीचा वापर मुसलमान समुदाय करणार नाही.’’ मौलाना सईद नूरी म्हणाले, ‘‘कोरोनावरील लसीमध्ये डुकराची चरबी, मांस आहे कि नाही ? हे प्रथम पाहिले जाईल. त्यानंतर इस्लामिक परिषदेकडून अनुमती मिळाल्यानंतरच मुसलमानांनी कोरोना लस घ्यावी.’’ इस्लामिक परिषदेचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या यांनी मात्र मानवी जिवाला वाचवणे, ही आपली प्राथमिकता आहे. पर्याय नसेल, तर इस्लामी बंधनापासून लस मुक्त ठेवण्यात यावी, असे मत व्यक्त केले.