नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास

काही संत आणि द्रष्टे यांनी पुढील १-२ वर्षांतच तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे मोठी हानी होऊ शकते, असे सांगितले आहे. यातून जनतेने स्वतःचे रक्षण करण्यासाठी उपययोजना कराव्यात आणि सरकारनेही त्यांना मार्गदर्शन करावे !

पाकिस्तानी सैन्याच्या बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

बलुचिस्तानसाठी लढणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. पत्रकार साजिद हुसैन यांचा ही असाच मृत्यू झाला होता !

पाक सरकारकडून राजधानी इस्लामाबादमध्ये हिंदु मंदिर उभारण्याला अनुमती

पाक सरकारने केवळ अनुमती देऊन थांबू नये, तर त्याचे बांधकाम करतांना आणि मंदिर उभारल्यावरही त्या रक्षणासाठी कायमस्वरूपी सशस्त्र बंदोबस्त करावा, असेच हिंदूंना वाटते !

अमेरिकेतील विद्यापिठामध्ये हिंदु धर्म आणि जैन पंथ यांच्या अभ्यासासाठी पिठाची स्थापना !

अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयी अभ्यास केला जातो आणि त्यासाठी पिठाची स्थापना केली जाते. भारतात मात्र शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर कथित निधर्मीवादी, बुद्धीवादी आणि पुरोगामी याला विरोध करतात !

अमेरिकेकडून पंतप्रधान मोदी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान ‘लीजन ऑफ मेरिट’ने सन्मानित केले. हा पुरस्कार भारत आणि अमेरिका यांच्यातील रणनीतीक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला.

भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात साहाय्य करावे ! – बलुची संघटनांचे आवाहन

बलोच नॅशनल मूव्हमेंटच्या ब्रिटनमधील शाखेने आणि तिच्याशी संबंधित संघटनांनी पाकमध्ये बलुच लोकांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्याची भारत सरकारकडे मागणी केली आहे. या संघटनांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात साहाय्य करण्याचेही आवाहन केले आहे.

पाकमध्ये १३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीचे धर्मांधांकडून अपहरण, बलात्कार, धर्मांतर आणि विवाह !

पाकमध्ये अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांविषयी मानवाधिकार संघटना, संयुक्त राष्ट्रे मौन का ? ‘सॉलिडॅरिटी अँड पीस मूव्हमेंट’नुसार प्रतिवर्षी सुमारे १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण, बलात्कार, धर्मांतर आणि नंतर त्यांचा विवाह केला जातो.

सौदी अरेबियाकडून ‘मुस्लिम ब्रदरहुड’ संघटनेचा निषेध करण्यास नकार देणारे १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी

आतंकवादी संघटनांचा निषेध न करणारे सौदी अरेबियात इतके इमाम आणि मौलवी असतील, तर भारतात त्यांची गणतीच करता येणार नाही !

मास्क आणि सामाजिक अंतर यांचे पालन न केल्याने चिलीच्या राष्ट्रपतींना अडीच लाख रुपयांचा दंड

भारतातील राजकीय नेतेही कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे सर्रास उल्लंघन उल्लंघन करत असतांना त्यांना दंड ठोठावण्याचे धाडस कुठलेही प्रशासन करत नाही, हे लक्षात घ्या !

नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे सरकार विसर्जित

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अचानकपणे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रीमंडळाची ही शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आली.