(म्हणे) ‘मी महमूद गझनीचा वंशज असल्याने पुन्हा सोमनाथ मंदिर पाडणार !’

पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचे फुत्कार ! धर्मांधांमध्ये सर्वधर्मसमभाव नसतो आणि ते अन्य धर्मियांच्या विशेषतः हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करतात, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! त्यांनी आता सोमनाथ मंदिराऐवजी ‘पाकचे रक्षण कसे होणार ?’, हेच पाहावे !

थायलंडकडून कोरोनावरील उपचारासाठी आयुर्वेदीय औषधाचा वापर करण्यास अनुमती

थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदानुसार एका वनस्पतीच्या अर्काच्या वापरास मान्यता दिली.

सैन्याने कुठल्याही क्षणी कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा आदेश

कुठल्याही क्षणी कारवाईसाठी पीपल लिबरेशन आर्मी सिद्ध असली पाहिजे. पूर्णवेळ युद्धजन्य परिस्थितीसाठी तुम्ही स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. प्रशिक्षण सरावामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करा.

जॅक मा अज्ञातस्थळी देखरेखीखाली आहेत ! – चीनच्या सरकारी वृत्तपतत्रचा खुलासा

चीनमधील आणि जगातील मोठे उद्योगपती तथा ‘अलिबाबा’ समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा गेल्या काही मासांपासून सार्वजनिक ठिकाणी न दिसल्याने ते बेपत्ता असल्याचे वृत्त पसरले आहे.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या उद्रेकामुळे भारत दौर्‍यावर येऊ शकत नाही !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे नियोजित भारत दौरा रहित केला आहे.

मंदिरांच्या भूमीवरील अवैध नियंत्रण हटवून ती मुक्त करावी !

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या संबंधित एक सदस्यीय आयोगाने खैबर पख्तूनख्वामधील एक मंदिर पाडल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.

२ आठवड्यांत मंदिर पुन्हा उभारा आणि तोडफोड करणार्‍यांकडून पैसे वसूल करा !

भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा येथील हिंदूंनाही असा न्याय मिळावा, अशी जनभावना आहे !

वर्ष २०२० मध्ये बांगलादेशात १४९ हिंदूंच्या हत्या, तर २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर

भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात.

अफगाणिस्तानने चीनच्या अटक केलेल्या १० गुप्तहेरांना गुपचूप सोडले !

अफगाणिस्तान सरकारने चीनच्या अटक केलेल्या १० गुप्तहेरांना क्षमा करून त्यांची विशेष विमानाने चीनमध्ये रवानगी केली आहे. या हेरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता.

चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पूर्ण केले तिबेटला जोडणार्‍या रेल्वेमार्गाचे काम !

तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी या शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वेमार्गासाठी रुळ बनवण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे.