पृथ्वीच्या जवळ येणार आहे लघुग्रह ! – संशोधकांची माहिती

पृथ्वीवर लघुग्रह धडकणार असल्याची नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी खरी होण्याची शक्यता

वॉशिंग्टन (अमेरिका) – १५ व्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्त्रेडॅमस् याने वर्ष २०२१ मध्ये पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची भविष्यवाणी वर्तवली आहे. अशी घटना होण्याची शक्यता असल्याची माहिती अंतराळ संशोधकांनी दिली आहे. फ्रान्समधील आयफेल टॉवर इतका मोठा असणारा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत आहे. तो पृथ्वीजवळून काही लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. ३ जानेवारीलाही अशा प्रकारचा एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून केला होता.