विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनकाळात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करतात मद्य-मांसाच्या मेजवान्या !

मौजमस्तीकडे कल असलेले शासकीय अधिकारी कामकाज कसे करत असतील ?, याची यावरून कल्पना येते. याविषयी केवळ परिपत्रक काढून न थांबता मद्यपी अधिकार्‍यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी !

६ वर्षांनंतरही अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई न करणार्‍यांची आर्थिक चौकशी करावी !

हिंदूंना अशी मागणी का करावी लागणे दुर्दैवी ! दबावापोटी कर्तव्य पार न पाडणारे प्रशासन काय कामाचे ?

Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या नौसेना दिनाच्या सिद्धतेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ या अतिथीगृहात झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नौदलाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

काश्मीरमध्ये मेजर आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

सैन्याला प्राप्त झालेल्या माहितीनंतर सैन्याने येथे लपलेल्या २ आतंकवाद्यांना घेरले. त्या वेळी ही चकमक झाली. अन्य एक सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

वाळू तस्‍करांकडून तलाठ्यांच्‍या अंगावर ट्रॅक्‍टर घालून जिवे मारण्‍याचा प्रयत्न !

उद्दाम वाळू तस्‍करांना कारागृहातच डांबायला हवे !

निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याकडून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आक्षेपार्ह वर्तनाविषयीची माहिती उघड !

सरकारने यातील दोषी पोलीस अधिकार्‍यांची नावे उघड करून, तसेच त्यांची पोलीस दलातून तात्काळ हकालपट्टी करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, असेच जनतेला वाटते !

पोलीस उपअधीक्षक शेख यांनीच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता !

लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; मात्र विरोधकांनी यास देवेंद्र फडणवीस यांना उत्तरदायी धरले होते.

राज्यात शासकीय कर्मचार्‍यांसह नागरिकांनाही मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे !

भूकंप, भूस्खलन, पूर, वादळ, आग आदी वारंवार उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींमध्ये आपत्ती निवारण पथकासह शासकीय कर्मचारी आणि राज्यातील नागरिक यांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत.

कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी ! – शौकत मुकादम

कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी. यासाठी परप्रांतीयांची निवड होता कामा नये, अशी चेतावणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना डोवाल यांनी उजाळा दिला, तसेच राज्य सरकारशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली, असे म्हटले आहे.