राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट !

मुंबई – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी १७ नोव्हेंबर या दिवशी ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना डोवाल यांनी उजाळा दिला, तसेच राज्य सरकारशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली, असे म्हटले आहे.