जळगाव – अवैध वाळूचे वाहन पकडल्याने तलाठ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच इतरांनाही मारहाण करण्यात आली. जिवे मारण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. योगेश पाटील, भूषण देवरे यांसह अन्य दोघांचा यात समावेश आहे. (कायदा-सुव्यवस्था हातात घेणारे वाळू तस्कर ! – संपादक)
चालक योगेश पाटील याने तलाठी संदीप शिंदे यांना शिवीगाळ करत ‘‘तुम्हाला मारायला माणसे आणतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने काही जणांना समवेत आणले. योगेशने ट्रॅक्टर चालू केला. इतक्यात इतर तलाठींनी संदीप शिंदे यांना बाजूला घेतल्याने त्यांचा जीव वाचला. भूषण देवरे याच्यासह अन्यांनी तलाठी पथकाच्याच काठ्या हिसकावून पथकाला मारहाण केली. यात तलाठ्यांना पुष्कळ मार बसला.
संपादकीय भूमिकाउद्दाम वाळू तस्करांना कारागृहातच डांबायला हवे ! |