वरिष्ठ पोलिसांनी एकत्र रहाण्याविषयी, तसेच सुंदर दिसण्याविषयी केली होती टिपण्णी !
मुंबई – निवृत्त भारतीय पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी नुकतीच ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आक्षेपार्ह वर्तनाविषयी धक्कादायक माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘मी पोलीस खात्यामध्ये कार्यरत असतांना एका विवाहित पोलीस अधिकार्याने मला एकत्र रहाण्याविषयी विचारणा केली होती, तर अन्य एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने ‘तुम्ही रागावल्यावर फार सुंदर दिसता’, अशी टिपणी केली होती.’’
‘यावर मी त्या अधिकार्यांना रागवल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी माझे अधिकार काढून घेतले. एका वरिष्ठ अधिकारी माझ्याकडे अयोग्य दृष्टीने पहायचा. धारिका दाखवण्याच्या बहाण्याने चहासाठी बसायला सांगायचा’, असेे धक्कादायक अनुभवही या मुलाखतीमध्ये मीरा बोरवणकर यांनी सांगितले. ‘महिला उच्च पदावर असूनही आणि पन्नाशी ओलांडूनही त्यांच्यावर वाईट प्रसंग ओढावू शकतात’, असे मत व्यक्त करून मीरा बोरवणकर यांनी मुलाखतीमध्ये खंत व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिका
|