आंध्रप्रदेशातील मंदिरांवरील आक्रमणाच्या चौकशीसाठी सरकारकडून विशेष अन्वेषण पथकाची स्थापना

सप्टेंबर २०२० पासून झालेल्या आक्रमणांची हे पथक चौकशी करणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार यांना याचे प्रमुख करण्यात आले आहे. या अन्वेषणातून खरे आरोपी सापडू देत, अशीच हिंदूंची अपेक्षा !

कोरोनाचे संकट असतांना नवरात्रोत्सवाचे मंडप घालू दिलेच कसे ? – उच्च न्यायालय

महापालिकेने कोरोनाच्या काळात अशा आयोजनाची अनुमती कशी दिली ?,-न्यायमूर्ती शाहरूख काथावाला

अग्नीशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव कार्यालयातून पुढे गेला नसल्याचे उघड

भंडारा येथील रुग्णालयात ‘इनक्युबेटर’जवळ नर्स असणे बंधनकारक असतांना ही घटना घडली तेव्हा नर्स या कक्षात नसल्याची माहिती पुढे येत आहे.

रंगकाम करण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेले वेदिक रंगांचे आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गायी जिवंत रहाणे आवश्यक आहे.

सोरायसिस, त्वचारोग आदींवर पंचगव्य उत्पादनांद्वारे उपचार करणे शक्य ! – राष्ट्रीय कामधेनू आयोग

रोगांवर पंचगव्य (गायीचे दूध, मूत्र, शेण आदींचे मिश्रण) उत्पादनांद्वारे उपचार करण्यात येऊ शकतात,

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमणे ! – भाजपचा आरोप

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपचे १५ कार्यकर्ते घायाळ झाले

उत्तरप्रदेशमध्ये नियमांचे उल्लंघन करून बढती मिळवणार्‍या ४ अधिकार्‍यांची थेट चौकीदार, कारकून आदी पदांवर नियुक्ती !

अशांची पदावनती न करता त्यांना थेट बडफर्तच केले पाहिजे; कारण अशा मानसिकतेच्या व्यक्ती खालच्या पदावर नियुक्त झाल्या, तरी पुन्हा भ्रष्टाचार करणार नाहीत, याची शाश्‍वती देता येणार नाही !

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी २७८ गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये १६७ जणांना अटक झाली आहे.

उच्च शिक्षण विभागाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठास नोटीस

महाराष्ट्र शासनाची अनुमती न घेता विद्यापिठाने त्यांच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयामध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ११ जानेवारीपासून चालू करण्याचा निर्णय घेतला असल्याने उच्च शिक्षण विभागाने विद्यापिठास फटकारले आहे.

१ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे जप्त

विवेकानंद कॉम्प्लेक्समधील बोढे कृषी केंद्रातून १ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी पोलिसांच्या साहाय्याने जप्त केली.