बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमणे ! – भाजपचा आरोप

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित न केल्याचा परिणाम !

भाजपचे १५ कार्यकर्ते घायाळ

मिदनापूर (बंगाल) – येथील कोंटाई भागामध्ये चालू असलेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपचे १५  कार्यकर्ते  घायाळ झाले, असा आरोप भाजपने केल आहे. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

दुसर्‍या एका घटनेत तृणमूलमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते शुभेंदु अधिकारी यांच्या नंदीग्राम येथील कार्यालयाची तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.