नवी देहली – सोरायसिस, त्वचारोग, एक्झीमा, गाठ, सूज, कुष्ठरोग यांसारख्या रोगांवर पंचगव्य (गायीचे दूध, मूत्र, शेण आदींचे मिश्रण) उत्पादनांद्वारे उपचार करण्यात येऊ शकतात, असे राष्ट्रीय कामधेनू आयोगाने म्हटले आहे. या आयोगाकडून पहिल्यांनाच गो विज्ञानाविषयी राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेण्यात आली आहे. या संदर्भात उपलब्ध करून देण्यात आलेल्या ५४ पानांच्या साहित्यामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.
गोमूत्राचा पोट, डोळे, मूत्राशय आदींच्या आजारांवर, तसेच कंबर, श्वास घेण्याची समस्या, रक्तशुद्धी यांवर चांगला परिणाम होतो, अशी माहितीही या साहित्यामधून देण्यात आली आहे.