
मुंबई – कोरोनाचे संकट कायम असतांनाच ऑक्टोबर २०२० मध्ये येथील महापालिकेने नवरात्रोत्सवासाठी मंडप घालण्यास अनुमती दिलीच कशी ? आणि अटींसह अनुमती दिली असेल, तर त्या अटींचे पालन होत आहे कि नाही, हे पडताळण्याची खबरदारी महापालिका प्रशासनाने घेतली का ?, असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच उपस्थित केले. महापालिकेने दिलेल्या अनुमतीविषयी आश्चर्य व्यक्त करून मुंबई आणि मुंबई उपनगरांत अशाचप्रकारे खासदार, आमदार, नगरसेवक यांना अशी आयोजने करण्यास दिलेल्या अनुमतीला स्वतंत्र जनहित याचिकेद्वारे कायदेशीर आव्हान देण्याची मुभाही न्यायालयाने याचिकादाराला दिली.

गिरीश मित्तल यांनी रिट याचिकेद्वारे दहिसरमधील नवरात्रोत्सवाच्या आयोजनाला आव्हान दिले होते. नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत या नवरात्रोत्सवाचे आयोजन केले होते; मात्र कोरोनाच्या संकटकाळात भव्य मंडप उभारून उत्सवाचे आयोजन करण्यास महापालिकेने दिलेल्या अनुमतीवर मित्तल यांनी आक्षेप घेतला, तसेच आयोजनाच्या संदर्भातील छायाचित्रेही न्यायालयात सादर केले होती.

‘मंडप आणि आयोजनाच्या छायाचित्रावरून नक्षीकाम असलेले भव्य खांब, मूर्ती, मंडपाला पायर्या, तसबिरी, फुलदाण्या असे बरेच काही पदपथावरच दिसत आहे. यासह बसण्यासाठी आसनव्यवस्था मंडपाबाहेरच केल्याचे दिसत आहे. मंडपात लोकांची गर्दी दिसत आहे. त्यातील अनेकांनी ‘मास्क’ही नीट घातलेले नाहीत. यावरून कोरोनाविषयी सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. मुळातच महापालिकेने कोरोनाच्या काळात अशा आयोजनाची अनुमती कशी दिली ?, असे न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि रियाझ छागला यांच्या खंडपिठाने म्हटले.
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
Indians In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !