कोरोनाच्या काळात कोरोना योद्धयांचे योगदान अतुलनीय ! – उज्वल निकम, अधिवक्ता

कोरोना योद्धयांनी जिवाची पर्वा न करता अवितरपणे केलेले काम निश्‍चितच गौरवास्पद आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे ! – भाजप महिला मोर्च्याची मागणी

धनंजय मुंडे यांनी तक्रारदार महिलेच्या बहिणीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांची स्वीकृती दिली आहे. मुंडे यांना ५ अपत्ये असल्याची वस्तूस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोग आणि जनता यांची फसवणूक केली आहे.

‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणीच्या आरोपपत्रातून अर्णव गोस्वामी आणि दासगुप्ता यांचे अनेक आक्षेपार्ह संवाद उघड

गुन्हे अन्वेषण शाखेने प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात ५०० पाने गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्या ‘चॅट’चीच आहेत. या संवादातून गोस्वामी यांना पुलवामा आक्रमण आणि एअर स्ट्राईक याची पूर्वकल्पना असल्याचे पुढे येत आहे.

‘पीएम केअर फंड’चा हिशोब सार्वजनिक करा !  

१०० निवृत्त सनदी अधिकार्‍यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

७१ सहस्र कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पुण्यातील सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

घडणार्‍या गुन्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते सापडण्याचे प्रमाणे अधिक असल्याने गुन्हेगारांचा भरणा असलेला पक्ष असे नाव दिल्यास त्यात चूक काय ?

यावल (जिल्हा जळगाव) येथे अनधिकृत बांधकाम करणर्‍या मशीद ट्रस्टच्या विरोधात गुन्हा नोंद !

सर्वत्र फोफावलेल्या अनधिकृत मशिदींच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ! या मशिदींनंतर येथे धर्मांधांची वस्ती वाढते आणि नंतर हिंदूंना या भागातून पलायन करण्याची वेळ येते !

लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता – गृहमंत्री

कोरोनाच्या लसीकरणाविषयी वैयक्तिक माहिती विचारणारे दूरध्वनी आले असतील, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी.

नागपूर येथे ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना समाज कल्याण अधिकार्‍याला अटक

भ्रष्ट अधिकार्‍यांना नुसते निलंबित करून चौकशी नको, तर कायमस्वरूपी बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !

फ्लाईंग राणी एक्स्प्रेसमध्ये तिकीट निरीक्षकाला मारहाण करणारे २ तरुण कह्यात

शासकीय कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍यांना कडक शिक्षा झाल्यास असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही !

पैसे घेऊन विलगीकरणातून सूट देणार्‍या कर्मचार्‍यांना अटक

स्वार्थासाठी जनतेच्या जीवावर उठलेल्या शासकीय कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई केली तरच इतरांना जरब बसेल !