सोलापूर जिल्ह्यात ११ केंद्रांवर कोविड लसीकरणास प्रारंभ 

कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास १६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यात ११ केंद्रांवर नियोजनबद्ध पद्धतीने प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० सहस्र १८४ आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना लस दिली जाणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या भूमीवरील शैक्षणिक आरक्षण कायम रहाण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करू ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार, भाजप

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या विश्रामबाग येथील सर्व्हे क्रमांक ३६३/२ या ६ सहस्र ६०० चौरस मीटर भूमीची भाजपचे आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी पहाणी केली.

आंध्रप्रदेशामधील मंदिरांवरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजप आणि तेलुगु देसम् यांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !

सीबीआयच्या भ्रष्टाचारी उपअधीक्षकाच्या घरावर सीबीआयच्याच पथकाची धाड

कुंपणच जर शेत खात असेल, तर कुणावर विश्‍वास ठेवायचा ? भ्रष्ट राजकारण्यांच्या संगतीमुळे आता अन्वेषण यंत्रणाही भ्रष्ट झाल्या आहेत !

पुण्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते १६ जानेवारी या दिवशी येथील कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू झाली. पुणे जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ३१ केंद्रांवर ३ सहस्र १०० जणांना लस देण्यात आली.

पोलीसदलाचे सध्याचे ब्रीदवाक्य ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ पोलीस सार्थकी लावतात का ?

​पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्‍याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत क्रमशः देत आहोत . . .

नागपूर खंडपिठाची पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस

‘आनंद साजरा करा; पण नायलॉन मांजा वापरू नका’, असे आवाहन सेंटरने केले आहे.

अधिकार्‍यांच्या स्थानांतराचा डॉ. लहाने यांनी घेतलेला निर्णय ‘मॅट’कडून रहित

डॉ. आनंद यांना १६ जानेवारीपर्यंत पुन्हा मूळ पदावर नियुक्त करण्याचा आदेशही न्या. ए.पी. कुर्‍हेकर यांनी दिला आहे.

मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणार्‍या महिलेच्या अधिवक्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या

‘एका कारागृहात नसतील तितक्या व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत’,- आमदार नीलेश राणे

१४ मेपर्यंत क्रीडा संकुलाचे काम आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार !

छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार.