उदयपूर (राजस्थान) येथे श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भंवर सिंह यांच्यावर गोळीबार !

करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित युवकाला पकडले असून पोलिसांना या विषयीची माहिती दिली आहे. आक्रमणामागील कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही.

नूंह येथे पुन्हा एकदा शोभायात्रा काढणार  !

१३ ऑगस्टला होणार्‍या हिंदु संघटनांच्या महापंचायतीमध्ये याविषयीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. १३ ऑगस्टच्या या महापंचायतीला प्रशासनाने अनुमती दिली नसल्याचे वृत्त आहे.

पणजी येथे उद्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’चे आयोजन

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याच्या मागणीवरून ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या अंतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना पणजी येथे शनिवार, १२ ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ !

पू. संभाजी भिडेगुरुजी यांची अपकीर्ती न थांबल्‍यास राज्‍यव्‍यापी आंदोलन करू ! – सकल हिंदु समाज, कोल्‍हापूर

अमरावती येथील सभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका धारकर्‍याला ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्‍तकातील उतारा वाचण्‍यास सांगितला होता. काँग्रेस सरकारच्‍या काळात प्रकाशित झालेले हे पुस्‍तक आहे. असे असतांना विधानसभेत आणि राज्‍यभर काँग्रेस, पुरोगामी, डावे अकारण पू. भिडेगुरुजी यांच्‍यावर खोटे आरोप करून त्‍यांची अपकीर्ती करत आहेत, आंदोलन करत आहेत.

पू. भिडेगुरुजींच्‍या समर्थनार्थ जळगावातील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना एकवटल्‍या !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या वक्‍तव्‍याच्‍या विरोधात घडणार्‍या घटनांच्‍या निषेधार्थ जळगाव जिल्‍ह्यातील समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देऊन या गैरप्रकाराचा तीव्र निषेध केला.

हिंदु जनसंघर्ष मोर्चा : हिंदु समाजात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे माध्यम !

हे मोर्चे इतक्या भव्य स्वरूपात निघाले की, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीमाध्यमांनाही हिंदूंच्या संघटनशक्तीची नोंद घ्यावी लागली. या मोर्च्याच्या वेळी आलेले काही अनुभव येथे देत आहे.

गोवा : पाद्री पेरेरा यांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक टिपण्णी करून हिंदु धर्मीय आणि शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी पाद्री पेरेरा यांच्या विरोधात वास्को पोलीस ठाण्यात कलम २९५ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली !

पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात दुसर्‍या दिवशीही तक्रार प्रविष्ट : मोर्चा, सभा आणि पत्रकार परिषद यांच्या माध्यमातून जनक्षोभ चालूच !

पाद्री पेरेरा यांनी केलेल्या विधानावरून राज्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने ४ ऑगस्टला वास्को पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला आणि पाद्री पेरेरा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली.

स्‍वराज्‍यकर्ता ‘देवतुल्‍य’च !

जरी ही घटना गोव्‍यात घडलेली असली, तरी सर्वत्रच्‍या शिवप्रेमींनी पेरेरा यांच्‍या विरोधात आवाज उठवून त्‍यांना पळता भुई थोडी करावी. हिंदूंनो, आता देशद्रोह खपवून घेऊ नका ! पेरेरा यांना वैध मार्गाने त्‍यांची जागा दाखवा. छत्रपती शिवरायांप्रमाणे इतिहास घडवून ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार व्‍हा !

‘जय श्रीराम’ लिहिल्‍याने ख्रिस्‍ती शाळेतील शिक्षकाची हिंदु विद्यार्थ्‍यास मारहाण

ख्रिस्‍ती शाळा वारंवार हिंदु विद्यार्थ्‍यांची गळपेची करतात, यावर सरकार कोणती कठोर कारवाई करणार ?