पू. भिडेगुरुजींच्‍या समर्थनार्थ जळगावातील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना एकवटल्‍या !

 

पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

जळगाव – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या वक्‍तव्‍याच्‍या विरोधात घडणार्‍या घटनांच्‍या निषेधार्थ जळगाव जिल्‍ह्यातील समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देऊन या गैरप्रकाराचा तीव्र निषेध केला. त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ‘प्रशासनाने संबंधितावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी करण्‍यात आली. या वेळी कार्यकर्ते, धारकरी उपस्‍थित होते. या वेळी पू. गुरुजींच्‍या प्रतिमेस दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला.